मन कधी हे बहरून येते, मन कधी कोमेजून जाते 
मन कधी फांदीवर झुलते रे 
मन कधी हे बावरलेले, मन कधी हे हिरमुसलेले 
मन कधी हे उमलून येते रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे ||
मन सागर हे, मन हे वारा, मन निर्झर हे, मन हे धारा 
मन देवाची नाजूक कविता रे 
सांगुनी क्षण गेला रे, भर मनाचा पेला रे 
बघ नशा जगण्याची चढते रे 
का मनाला शिणवावे, का उगाचच अडवावे 
रे मनावीन काही न घडते रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे || 
मन हे आशा मन निराशा, मन असे जगण्याची भाषा 
जग हे सारे मनी नांदते रे 
चल मनाला सोबत घेऊ, ईश्वराशी बोलून येऊ 
तो अलबेला मनात रमतो रे 
मन झुरे तर तोही झुरतो, मन हसे तर तोही हसतो 
मन कळे त्या ईश्वर कळला रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे || 
---संदीप खरे (movie - कशाला उद्याची बात 2012) 

No comments:
Post a Comment