नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।
।। भारत माता की जय ।।
Saturday, November 30, 2013
Wednesday, August 14, 2013
Sunday, June 9, 2013
आई
अस्तित्व नष्ट कराया
मी हळूच पांघरून घेतो
आईची हळवी माया
ती पैलावरती माया
ऐलावर होते रात
ठेवता उशीवर डोके
केसातून फिरतो हात
का डोळ्यामध्ये आसू
का अंतर्मन व्याकूळ
गगनात भारली प्रतिमा
अस्पष्ट करतसे धूळ
झाकल्या पदराखाली
आयुष्याचे कोंदण
आईच्या हातावरती
एक पिंडीचे गोंदण
हातात चंद्र धरून
स्वप्नात भेटते आई
घेऊन कुशीत मजला
गाते अजूनही अंगाई
--- विशाल
अदृश्य मिठी
पाउस थेंब थेंबाने
पानावरुनी ओघळतो
अस्तित्व उदासीन माझे
आज झुगारून देतो
कोसळत्या धारातून
क्षितिजावर दिसे न काही
अंतरात डोकावुनी
भिजलेला सूर आठवतो
ओला रस्ता ओले मन
ओली सांज प्रेमही ओले
रुततात जीवाला ओल्या
चिमणीचे व्याकुळ डोळे
सरतात मुक्याने आता
नात्यांचे दंश विषारी
त्या नाग घळीतून रात्री
फुत्कार निनावी घुमतो
एकाकी रात्र आताशा
मळभाची घेऊन चादर
सत्याला स्वप्न म्हणून
अदृश्य मिठीत मी शिरतो
--- विशाल
पानावरुनी ओघळतो
अस्तित्व उदासीन माझे
आज झुगारून देतो
कोसळत्या धारातून
क्षितिजावर दिसे न काही
अंतरात डोकावुनी
भिजलेला सूर आठवतो
ओला रस्ता ओले मन
ओली सांज प्रेमही ओले
रुततात जीवाला ओल्या
चिमणीचे व्याकुळ डोळे
सरतात मुक्याने आता
नात्यांचे दंश विषारी
त्या नाग घळीतून रात्री
फुत्कार निनावी घुमतो
एकाकी रात्र आताशा
मळभाची घेऊन चादर
सत्याला स्वप्न म्हणून
अदृश्य मिठीत मी शिरतो
--- विशाल
Saturday, June 8, 2013
Sunday, May 26, 2013
उत्तुंग पातळीचे वैज्ञानिक ऋषीमुनी सहस्रो वर्षांपूर्वी विज्ञानाच्या भाषेत चर्चा करणारे ऋषी !
अतीसूक्ष्म कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !
वेदकालानंतर अतीविशाल आणि अतीसूक्ष्म अशी कालगणना भारताने केली. ती महाभारत, पुराणे इत्यादि ग्रंथात समाविष्ट केलेली आढळते. श्रीमद्भागवत पुराणात ३/११ येथे पुढीलप्रमाणे कोष्टक दिलेले आहे.
१ अहोरात्र = ८ प्रहर = २४ तास
१ अह = १ रात्र = ४ प्रहर = १२ तास
६ नाडिका = १ प्रहर = ३ तास
२ नाडिका = १ मुहूर्त = १ तास = ६० मिनिटे
१५ लघु = १ नाडिका = ३० मिनिटे
१५ काष्ठा = १ लघु = २ मिनिटे = १२० सेकंद
५ क्षण = १ काष्ठा = ८ सेकंद
३ निमेष = १ क्षण = १.६ सेकंद
३ लव = १ निमेष = ०.५३ सेकंद
३ वेध = १ लव = ०.१७ सेकंद
१०० त्रुटि = १ वेध = ०.०५६ सेकंद
३ त्रसरेणु = १ त्रुटि = ०.०००५६ सेकंद
३ अणु = १ त्रसरेणु = ०.०००१९ सेकंद
२ परमाणु = १ अणु = ०.००००६३ सेकंद
१ परमाणु = ०.००००३२ सेकंद
श्रीमद् भागवताचा काळ इसवीसनपूर्व १ सहस्र ६५२ वर्षे आहे. तीन सहस्र वर्षांपूर्वी सेकंदाचा दशलक्षांश भाग भारतियांनी का शोधला असावा ? त्यांनी अतीवेग धारण केलेला असावा किंवा पेशीविभाजनसारख्या अतीसूक्ष्म हालचाली ते निरीक्षत असावे. दुसरे काही कारण संभवत नाही. - (वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. ५५-५६, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)
स्थळ आणि काळ जोडलेले असणे (स्पेस-टाइम-कंटिन्युअम), या विज्ञानाने मांडलेल्या अत्याधुनिक सिद्धांताचे बीज भारतीय प्राचीन विज्ञानात आहे !
तिसर्या शतकात ब्रह्मगुप्त नावाच्या ज्योतिष्याने पवित्रक (कालपुरुष) गणित मांडले.
हिंदूंची काल संकल्पना
आपली काळाची धारणा ही पाश्चात्त्यांच्या काळसंकल्पनेसारखी संकुचित आणि क्षुद्र नाही. चतुर्युगाची कल्पना ही एका अतिप्रचंड काल संकल्पनेचा एक लहानसा उपविभाग आहे. आपली कालसंकल्पना ऐकून पाश्चात्त्यांची उफाळणारी संकल्पनाच त्यांचे डोळे पांढरे करील. पाश्चात्त्यांची उकळणारी soaring fancy सनातन हिंदूंची कालकल्पना ऐकताच झोकांड्या खाईल. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑगस्ट २००६)
अणूकणांमधील एनर्जी आणि त्या शक्तीमागचे विश्वमन हा क्रम आज अनेक शास्त्रज्ञही स्वीकारत आहेत. उपनिषदे आणि योगवसिष्ठ यांत काल अन् अवकाश यांच्या परिमाणांची डोळस चर्चा आढळते. आजच्या विज्ञानातील परिमाणचर्चेशी सदृश्य अशी ही चर्चा हिंदूंच्या प्रगल्भ मनावर प्रकाश टाकणारी आहे.
Wednesday, May 15, 2013
जेवणाची चव
लहानपणी आईसोबत बाजारात जायला मला कधीच आवडले नाही पण ती आवर्जून मला घेऊन जायची. रविवार आणि गुरुवार असे दोनच दिवस बाजार भरायचा. पण या दोन तीन दिवसाचा बाजार खरेदी करतानाही आईला तास का लागायचा मला त्यावेळी कधीच समजले नाही. ती आधी सगळीकडील भाजी पहात, भाव विचारीत पूर्ण शेवटपर्यंत जायची आणि परत येताना खरेदी चालू करायची. अगदी चार दोन रुपयांसाठी पण मोलभाव करायची. ढिगामधील एखादी गवारी भेंडी मोडून, काकडी दुधीमधे नख खुपसुन त्याचा कोवळेपणा तपासायची. भुईमुगाच्या किंवा वाटाण्याच्या शेंगा फोडून खाउन मगच घ्यायची. फळेच काय पण अगदी बटाटे आणि टोमाटोसुद्धा स्वतः एकेक निवडून घ्यायची. आणि वरती त्या भाजी किंवा फळविक्याला "अहो मावशी अहो मामा" म्हणत वर एक्स्ट्रा भाजी किंवा फळ घ्यायची. मला हे सारे त्यावेळी कसेतरीच वाटायचे.
काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना"
बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले
---- विशाल (ठाणे १५.०५.२०१३ )
काल येताना अशीच एक थोडीशी वेगळ्या रूपातील आई मला पाहायला भेटली. आई म्हणतोय कारण एक चिमुरडी तिच्या आजूबाजूला फिरत होती. घट्ट जीन्स, वर सैल टीशर्ट अशा रूपात ती एका भैय्याच्या हातगाड्यावरून भाजी खरेदी करत होती. एका हाताने मोबाईल कानाशी धरून बोलणे चालू होते आणि ड्रेसला शोभेल अशा नेलपोलीश लावलेल्या, मोठे नख असलेल्या तर्जनीने, भाजीकडे न पहाताच आणि बहुधा चुकून भाजीला स्पर्श झाला तर शॉक बसेल कि काय अशा समजाने अर्ध्या फुटाचे अंतर ठेऊन ती भैय्याला म्हणत होती "आधा किलो टमाटर, आधा किलो कांदा, पाव किलो मटार ,एक गोभी …. और पाच कि मिरची देना"
बस संपला बाजार.. हल्ली रासायनिक खतांमुळे भाजीचा कस तर उतरलाच आहे पण जेवणाची चव हि का उतरली आहे याचे उत्तर मिळाले
---- विशाल (ठाणे १५.०५.२०१३ )
Tuesday, March 12, 2013
Monday, February 4, 2013
Monday, January 28, 2013
Sunday, January 20, 2013
Sunday, January 13, 2013
Saturday, January 12, 2013
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलस गाव ४
तुझे लांब लांब केस तुझी लांब लांब वेणी
तुझ्या केसामध्ये माझं मन गुंतलं साजणी
जीव गुंतला केसात मन गुंतलं गुंतलं
तुझ्या सौंदर्याच त्यात धन गुंतलं गुंतलं
सखी चालतेस तेव्हा वेणी ऐटीत हालते
खुल्या माळावर जशी कुणी नागीण डोलते
हिला ठेऊ नको मागे सखे तिला पुढे टाक
धन पडले समोरी असो चोरावर धाक
सखे नाही भरवसा कुणी कुठून येईल
तुझ्या सौंदर्याच धन कोणी लुटून नेईल
लाख मोलाच साजणी तुझ्या रूपाच हे धन
तुझी वेणी टाक पुढे तिला करू दे राखण
आम्ही फुकटात किती त्याच्याकडे लक्ष द्यावं
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलस गाव ..