Tuesday, November 29, 2011
Monday, November 28, 2011
देव चोरला माझा
देव चोरला माझा देव चोरला...
भला थोरला माझा देव चोरला ...
झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला
रोषणाईमध्ये देव माझा हरवून गेला
नाही उरली भक्ती ... भाव नाही उरला ...
देव चोरला ...
हरवून गेले संत काल उरलेले थोडे
पावलांचे नसे मोल आज महागले जोडे
टेकू चरणी माथा असा कोण उरला ...
देव चोरला ....
--- मोरया (अवधूत गुप्ते )