नाही नाही म्हणताना असण्याची झाली जाण
स्वप्न शब्दांचे पाहती पेंगुळले ओठ दोन
त्याची जाणीव भलती ओलसर अधरात
थरथरत्या कुपीत एक लपलेले गीत
शब्द एक अर्थ दोन एक तुझा एक माझा
भात मऊ गं चिऊचा पिंड का गं कावळ्याचा
हरवलो तू आणि मी असण्यात नसण्यात
शब्द गीत अर्थ सारे दाट गहिऱ्या धुक्यात
कातरले पुन्हा ओठ रंग पसरे गुलाबी
साशंक मनात तरी अजूनही नाही नाही
विरघळून गेले धुके अधरी नवे स्पंदन
शब्द वेचताना नवे असण्याची झाली जाण
--- विशाल (२७.०७.२०१६ बाणेर, पुणे )
No comments:
Post a Comment