आठवतं.. त्यादिवशी सापशिडीच्या खेळात २ चे दान पडून, ९८व्या घरातल्या सापाने मला खाल्ले होते. आणि ६७व्या घरावर घसरलो होतो मी ...
किती खळखळून हसली होतीस. आणि पुढे खेळण्याऐवजी दिलीस एक मोठी जांभई. म्हणालीस झोप आलीये रे खूप, शिल्लक डाव नंतर खेळू. ...
.
.
.
अजूनही तो डाव अर्ध्यावरच आहे....
तो बोर्ड, ते फासे.. सापडत नाहीयेत आता ...
आणि तूही ...
डाव अर्ध्यावर आहे ... अजूनही ..
-- विशाल (०२.०८.२०१६)
No comments:
Post a Comment