Thursday, September 15, 2011

अस्वस्थ

तू का गं इतकी दूर ? 
नदीला पूर ,
सागरा भरती...
मी एक अजाण अस्वस्थ ,
असा उध्वस्त ,
किना-यावरती ...

उध्वस्त किनारा ,
तळमळणारा ,
मनातूनी थरकाप ...
याद छळे ,
तुज का न कळे ?
पाण्यात आगीची छाप ...

चढते पाणी ,
मी अनवाणी ,
पाउलखुणा वाळूत ...
आकाश भरे ,
डोळ्यात झरे ,
पण दोन क्षणांची बात ...

क्षण दोन तरी ,
रुतलेत उरी ,
न भरलेले घाव ...
अंदाज नसे ,
उमटते कसे ,
अस्पष्ट तुझे नाव ...

--- विशाल 

No comments:

Post a Comment