देऊळ कफल्लक , वितळू लागे खांब
गाभारी ध्यानस्थ तरीही सांब
दुरून पार्वती जपे कसे सौभाग्य
रोज उशीवर विरघळलेले थेंब
ही आर्त हाक कि वनी लागली आग
चिंतेत पार्वती कुठवर जपू विराग
उंब-यात पाउल चाहूल सदाशिवाची
अर्ध्यावर तुटले स्वप्न... आली का जाग ?
----- विशाल
No comments:
Post a Comment