Friday, June 3, 2011

दामलेच्या पोरीचीही कहाणी

संदीप खरे , सलील कुलकर्णी आणि या सुंदर मूळगीताशी जोडल्या गेलेल्या भावानिकांची माफी मागून 


कॉलेजात नवी आली एक परीराणी 
काळेभोर डोळे, लाल ओठांमध्ये गाणी 
घडले काही जे कधी घडलेले नाही 
ऐकताना नको म्हणू 'तुला लाज नाही ?' 
नुकतीच होती तीही शिरली विशीत 
तिला पहाताना चहा निवला बशीत 
समजून घे तू सांगे तुझा छकुला 
दामलेच्या पोरीचीही कहाणी तुला
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....

त्यादिवशी कॉलेजात गर्दी होती भारी
नवीन admision साठी जमली पोरं पोरी 
टपरीवर सकाळी आमचे टोळके बसलेले 
 कॉलेजात कोण नवे पाखरू रे आले 
मला पण जाण्या जरा उशीरच झाला 
सकाळचा तळलेला वडा थंड झाला 
बंद पडल्या बाईक ला घालताना शिवी 
नजरेसमोर आली रुपाची ती देवी 
अन पुढचा शब्द गळ्यामध्ये थिजला 
दामलेच्या पोरीची हि कहाणी तुला
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....

काय सांगू रूप ती गं मोगा-याची कळी
गुलाबाची उमलते गालावर खळी
दुरून पाहून कुणी मारली ना शिटी 
तिथेच धुतले त्याला मी गं तिच्यासाठी 
एक मग डायलॉग मारला जरा 
लाजून  गुलाबी झाला तिचा चेहरा 
हसुनी तिने असे पाहिले मला 
दामलेच्या पोरीचीही कहाणी तुला
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....

सुरळीतपणे नंतर चालू झाले सारे 
वाहू लागले मनात प्रेमाचे हे वारे 
वयात आल्यावर घडतेच असे 
'ऐकून घे ना डोळे मोठे करतीस कसे ?'
तीही सोबतीने माझ्या होती गं तयार 
फौजीमध्ये तिचा बाप 'दामले मेजर '
दोघांना आम्हाला त्याने पाहिले दुरून 
धाउनिया आला तोही बंदुक घेऊन 
जणू काही सीमेवर शत्रू दिसला 
दामलेच्या पोरीचीही कहाणी तुला
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....


आता तुझ्याकडे आई एकाच मागणे 
नाही आता तिच्याविना एकटे जगणे 
दिलाची हि गोष्ट त्यात करू तरी काय ?
तूच सांग मला तरी सुचेना उपाय 
उपयोगी नाही आली मित्रांची टोळी 
रायफल पाहून झाली त्यांचीही पिवळी 
घेतलेले आम्ही आहे लग्नाचे वाचन 
तू हो म्हणशील तर आणतो पळवून 
किंवा तू तिच्या बापाशी बोलशील का गं ?
रीतसर लग्नाची गोष्ट करशील का गं ?
तुझ्यापासून मी काहीही लपवले नाही 
तुझ्या शब्दाबाहेर मी जाणारही नाही 
मनातली घालमेल समजेल ना ही ?
माझ्याहून जादा तू मला जाणतेस आई
ना ना ना ना ना ... ना ना ना ना ना ....

------ विशाल 

No comments:

Post a Comment