Tuesday, August 16, 2011

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव २

तुला दुरून पाहिलं कधी झुरून पाहिलं 
तुझं डोळ्यातील रूप हाती धरून पाहिलं 

तुझं देह चंदनाचा  तुझी चांदण्याची काया
तुझं पदर उडतो जणू आभाळाची छाया 

तुझ्या रूपाचा दरारा जशी वाघीण चालली 
सारं शहारलं रान जशी नागीण चालली 

तुझी चाल नागिणीची माझे थरारते मन 
तुझा धरून पदर माझं भरारते मन 

तुझा पदर चावट त्याने ढळून पाहिलं 
मीही वळून पाहिलं जरा जळून पाहिलं 

सांग जळू असा किती? सांग जाळणार किती ?
रोज टाळतेस पुन्हा सांग टाळणार किती?

तुझी हौस टाळण्याची माझ्या उरामध्ये घाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव

No comments:

Post a Comment