--- विशाल (१८/११/२०१२)
Saturday, November 17, 2012
कुठे एक दिवा पेटला नसता कि कुठे एक तोंड गोड झाले नसते, यम कदाचित दाराशी येऊन थांबला असेल तरी साहेब म्हणाले असतील "मला माहित आहे तू मला न्यायला आला आहेस पण अजून दोन दिवस थांब यमा , वर्षभर नाना त्रासांनी गांजलेल्या माझ्या त्रस्त महाराष्ट्राला, माझ्या गरीब शिवसैनिकाला निदान दिवाळीनिमित्त दोन दिवस आनंद साजरा करू दे , सर्व दु:ख विसरून सुखाने तोंड गोड करू दे, भावांना ओवाळणा-या माझ्या मराठी बहिणींच्या चेह-यावरचे हसू एकदा शेवटचे पहातो आणि मग मी स्वत तुझ्यासोबत येतो." आयुष्यभर ते वाघासारखे लढले. अनेक शत्रू परास्त केले आणि त्यावर शिरपेच म्हणून कि काय अखेरच्या क्षणी बाजीप्रभूंच्या धडाडीने प्रत्यक्ष मरणास खिंडीत अडवून धरले कि महाराष्ट्राची दिवाळी साजरी होऊ दे.... मी शिवाजी महाराजांना पहिले नाही, मी बाजीप्रभूंना पहिले नाही पण आज मी म्हणू शकतो मी बाळासाहेबांना पाहिले ... भरून पावलो ....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment