Saturday, September 24, 2011

तुझ्या गाली ओघळले पावसाचे दोन थेंब 
अन ओठ माझे वेडे तरीदेखील लांब 
क्षणभरात तृष्णा उसळली शतजन्माची 
जे दिसले ते संयमाचे फक्त एक दंभ ...
---- विशाल 

Thursday, September 15, 2011

अस्वस्थ

तू का गं इतकी दूर ? 
नदीला पूर ,
सागरा भरती...
मी एक अजाण अस्वस्थ ,
असा उध्वस्त ,
किना-यावरती ...

उध्वस्त किनारा ,
तळमळणारा ,
मनातूनी थरकाप ...
याद छळे ,
तुज का न कळे ?
पाण्यात आगीची छाप ...

चढते पाणी ,
मी अनवाणी ,
पाउलखुणा वाळूत ...
आकाश भरे ,
डोळ्यात झरे ,
पण दोन क्षणांची बात ...

क्षण दोन तरी ,
रुतलेत उरी ,
न भरलेले घाव ...
अंदाज नसे ,
उमटते कसे ,
अस्पष्ट तुझे नाव ...

--- विशाल 

Tuesday, September 13, 2011

जिंदगी ना मिलेगी दोबारा


दिलोमे तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो
तो जिंदा हो तुम
नजरमे ख्वाबोकी बिजलीया लेके चल रहे हो
तो जिंदा हो तुम
हवाके झोकोके जैसे आझाद रहना सिखो
तुम एक दरीयाके जैसे लहरोमे बहना सिखो
हर एक लम्हेसे तुम मिलो खोले अपनी बाहे
हर एक पल एक नया समा देखे ये निगाहे
जो अपनी आंखोमे हैरानिया लेके चल रहे हो
तो जिंदा हो तुम
दिलोमे तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो
तो जिंदा हो तुम



---- जावेद अख्तर 

Thursday, August 18, 2011

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वा-याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

 संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
 देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

------ ग्रेस