Showing posts with label तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव. Show all posts
Showing posts with label तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव. Show all posts

Saturday, January 12, 2013

तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलस गाव ४

तुझे लांब लांब केस तुझी लांब लांब वेणी 
तुझ्या केसामध्ये माझं  मन गुंतलं साजणी 

जीव गुंतला केसात मन गुंतलं गुंतलं 
तुझ्या सौंदर्याच त्यात धन गुंतलं गुंतलं 

सखी चालतेस तेव्हा वेणी ऐटीत हालते 
खुल्या माळावर  जशी कुणी नागीण डोलते 

हिला ठेऊ नको मागे सखे तिला पुढे टाक 
धन पडले समोरी असो चोरावर धाक 

सखे नाही भरवसा कुणी कुठून येईल 
तुझ्या सौंदर्याच धन कोणी लुटून नेईल 

लाख मोलाच साजणी तुझ्या रूपाच हे धन 
तुझी वेणी टाक पुढे तिला करू दे राखण 

आम्ही फुकटात किती त्याच्याकडे लक्ष द्यावं 
तुझ्या टपोऱ्या  डोळ्यात माझं  इवलस गाव ..

Thursday, August 18, 2011

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव ३

तुझे गोल गोल गाल तुझे बहुमोल गाल 
तुझ्या नाजूक गालांना कुणी फासला गुलाल 

कुणी छेडले गालांना गाल गोरेमोरे झाले 
गाल लाजले साजणी गाल पाठमोरे झाले 

गाल हसले साजणी गाल रुसले साजणी 
वाट पहाता कुणाची गाल बसले साजणी 

घोळ झाला काहीतरी फार झाली काय घाई 
माझ्या ओठांना निरोप तुझा पोचलाच नाही 

माझे ओठ परेशान तुझे गाल परेशान 
गुलाबाचं  पानपान सखे झाले परेशान 

तुझा निरोप एकदा पुन्हा येऊ दे साजणी 
भेट गालाची ओठाची आज होऊ दे साजणी 

ओठ माझे साधे भोळे तुझं स्मरतील नाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव

Tuesday, August 16, 2011

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव २

तुला दुरून पाहिलं कधी झुरून पाहिलं 
तुझं डोळ्यातील रूप हाती धरून पाहिलं 

तुझं देह चंदनाचा  तुझी चांदण्याची काया
तुझं पदर उडतो जणू आभाळाची छाया 

तुझ्या रूपाचा दरारा जशी वाघीण चालली 
सारं शहारलं रान जशी नागीण चालली 

तुझी चाल नागिणीची माझे थरारते मन 
तुझा धरून पदर माझं भरारते मन 

तुझा पदर चावट त्याने ढळून पाहिलं 
मीही वळून पाहिलं जरा जळून पाहिलं 

सांग जळू असा किती? सांग जाळणार किती ?
रोज टाळतेस पुन्हा सांग टाळणार किती?

तुझी हौस टाळण्याची माझ्या उरामध्ये घाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव १

आज एक गाणे ऐकण्यात आले 'तुझ्या टपो-या  डोळ्यात माझा इवलासा गाव'. मिलिंद इंगळेनी गायलेल्या आणि ज्ञानेश वाकुडकरांनी लिहिलेल्या या गेय कविता.याचे विशेष म्हणजे यात मुखडा आहे पण तो फक्त सुरुवातीला आणि शेवटीच. मध्ये संपूर्ण कविताच आहे. २१ कवितांनी सजलेला हा अल्बम मी वेळ मिळेल तसा इथे पोस्ट करेन. त्यातली हि पहिली कविता 

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव 
तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव

तुझ्या मिठीत आकाश तुझ्या मुठीत आकाश 
माझं हवेत आकाश तुझ्या कवेत आकाश 

तुझ्या पावलांचे ठसे गडे क्षितिजापल्याड 
तुझी बहरली बाग माझं सुकलेलं झाड 

तुझी बहरली बाग तुझी चर्चा जागोजाग 
तुझा श्रावण जोरात माझ्या मनामध्ये आग 

सारं जग तुझ्यासाठी माझी आग तुझ्यासाठी 
माझी झोप तुझ्यासाठी माझी जाग तुझ्यासाठी 

जीव जागतो उगाच साद देशील म्हणून 
वाट पहातात डोळे तुझी येशील म्हणून 

तुझी चाहूल घेऊन आला पहाटेचा वारा 
मला खुणावतो वेडा तुझ्या गावचा किनारा 

हाती लागेना किनारा माझी चिखलात नाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव