Showing posts with label गीत गुंजन. Show all posts
Showing posts with label गीत गुंजन. Show all posts

Friday, September 15, 2017

लाजून हासणे - शरमाके मुस्कुरायें

लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे

डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे

                                                                           - मंगेश पाडगावकर




शरमाके मुस्कुरायें यू हसके देखे हाए
मै जानता हू जालीम सारी तेरी अदाए

बोझलसी लग रही है पलके निगाहोपर क्यूँ
उतरे क्यूँ चांद इनमे जबभी मै नैन मूंदू
ये सवाल जानलेवा जो बुझे सो मात खाए

घायल का हाल क्या है जाने भला क्या कातिल
जिसने है तीर खाए, ये दर्द समझे वो दिल
तिरछी नजर ये हमको दिवाना करके जाए

गुजरे तू सामनेसे खिल जाए तारे हर-सू
बहार-ए-चमनसे लेके आए पवन ये खुशबू
इक गीत चांदनीका फिर रात गुनगुनाए

                                                                                 - विशाल (१५/०९/२०१७)

Friday, December 7, 2012

हि वाट कशी अन कुठे मला नेईल

हि वाट कशी अन कुठे मला नेईल 
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन 

मी पाठ फिरवुनी चालत गेलो दूर 
कधी मनास भिडला नाही व्याकुळ सूर 
का आज बंधने तोडून आला पूर 
जे कधीच नाही दिसले ते पाहीन 
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन 

तुटले पुरती मी तरी धावते आहे 
पापणीत ओल्या उगाच हसते आहे 
मन पुन्हा पुन्हा पण मला सांगते आहे 
एकटीच होते एकटीच राहीन 
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन

कुणी बुवा मांडतो खेळ इथे श्रद्धेचा 
देहाचा कुणी मायेचा कुणी सत्तेचा 
मज ठाऊक  एकच मालक या जगताचा 
त्या ईश्वरास मी रातंदिन शोधीन 
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन

धावतो कशाच्या मागे मी तोडून सारे धागे 
काळोख सरेना मज वाट दिसेना 
दिसले सुख जे दुरुनी फिरुनी लपले 
क्षण एक सुखाचा दैवाला मागेन 
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन
---- विठ्ठल विठ्ठल 

Sunday, October 28, 2012

मन वेडे मन कुणालाही न कळते रे


मन कधी हे बहरून येते, मन कधी कोमेजून जाते 
मन कधी फांदीवर झुलते रे 
मन कधी हे बावरलेले, मन कधी हे हिरमुसलेले 
मन कधी हे उमलून येते रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे ||

मन सागर हे, मन हे वारा, मन निर्झर हे, मन हे धारा 
मन देवाची नाजूक कविता रे 
सांगुनी क्षण गेला रे, भर मनाचा पेला रे 
बघ नशा जगण्याची चढते रे 
का मनाला शिणवावे, का उगाचच अडवावे 
रे मनावीन काही न घडते रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे || 

मन हे आशा मन निराशा, मन असे जगण्याची भाषा 
जग हे सारे मनी नांदते रे 
चल मनाला सोबत घेऊ, ईश्वराशी बोलून येऊ 
तो अलबेला मनात रमतो रे 
मन झुरे तर तोही झुरतो, मन हसे तर तोही हसतो 
मन कळे त्या ईश्वर कळला रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे || 

---संदीप खरे (movie - कशाला उद्याची बात 2012) 

Thursday, May 24, 2012

दिल आज शायर है..


दिल आज शायर है गम आज नगमा है शब् ये गजल है सनम 
गैरोके शेरोको ओ सुननेवाले हो इस तरफभी करम 

आके जरा देख तो तेरी खातिर हम किस तरहसे जिए 
आसुके धागेसे सीते रहे हम जो जख्म तुने दिए 
चाहतकी महफिलमे गम तेरा लेकर किस्मतसे खेला जुआ 
दुनियासे जीते पर तुजसे हारे यु खेल अपना हुआ 

है प्यार हमने किया जिस तरहसे उसका न कोई जवाब 
जर्रा थे लेकिन तेरी लौ में जलकर हम बन गए आफताब 
हमसेही जिन्दा वफ़ा और हमीसे है तेरी महफ़िल जवां
हम जब न होंगे तो रो रोके दुनिया ढूंढेगी मेरा निशाँ 

रे प्यार कोई खिलौना नहीं है हर कोई ले जो खरीद 
मेरी तरह जिंदगीभर तड़प लो फिर आना उसके करीब 
हम तो मुसाफिर है कोई सफ़र हो हम तो गुजर जायेंगेही 
लेकिन लगाया है जो दाव हमने वो जीतकर आयेंगेही 
---  Gamblar 1971 (गीतकार: नीरज )


Sunday, May 20, 2012

ऐल माझा गाव, पैल माझा देव गं

ऐल माझा गाव, पैल माझा देव गं 
जाऊ दे सोडून नीती ओढून नेतो भाव गं ...

मिटतात पापण्या आणि उसळतो आठवणींचा सागर 
मी समिधा माझी वाहून जपला तुझ्या स्मृतींचा जागर 
कंठात दाटतो हुंदका अन काळजात घाव गं ...

वाळूत खुणा अजुनी का जसे व्रण ताजेच असावे
ओझे धरणीवरती जे माझे अस्तित्व मिटावे 
माझ्या पापी राखेला इथे नको ठाव गं ...

मी मोहाने थरथरले, मी वाऱ्यावर भिरभिरले 
या दिशा दहा हसतात, मी इथे फक्त फरफटले 
आता पुन्हा दे धीर, भोवती भूतांचा घेर 
हि आर्त ऐक रे हाळी, वासना सांडो आंधळी 
हा तुटता आतून पीळ, सावरे मला घननीळ 
ऐल माझा गाव पैल माझा देव गं ..

Movie - विठ्ठल विठ्ठल (संगीतकार - सलील कुलकर्णी )

Wednesday, April 25, 2012

तव नयनांचे दल

तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी 
त्रिभुवन हे डळमळले गं || धृ ||

तारे गळले वारे ढळले 
दिग्गज पंचाननसे वळले 
गिरी ढासळले सूर कोसळले 
ऋषी मुनी योगी चळले गं || १ ||

ऋतुचक्राचे आस उडाले 
आभाळातून शब्द निघाले 
आवर आवर आपुले भाले 
मीन जळी तळमळले गं || २ ||

हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली 
दोन हृदयांची किमया घडली 
पुनरपि जग सावरले गं || ३ ||

---- बा भ बोरकर 

Sunday, April 1, 2012

संधीप्रकाशात

आयुष्याची आता | झाली उजवण |
येतो तो तो क्षण | अमृताचा ||

जे जे भेट ते ते | दर्पणीचे बिंब |
तुझे प्रतिबिंब | लाडे गोडे ||

सुखोत्सवे असा | जीव अनावर |
पिंज-याचे दार | उघडावे ||

संधीप्रकाशात | अजून जो सोने |
तो माझी लोचने | मिटू यावी ||

असावीस पास | जसा स्वप्नभास |
जीवी कासावीस | झाल्याविना ||

तेव्हा सखे आण | तुळशीचे पान |
तुझ्या घरी वाण | नाही त्याची ||

तूच ओढलेले | त्यासवे दे पाणी |
थोर ना त्याहुनी | तीर्थ दुजे || 

वाळल्या ओठा दे | निरोपाचे फूल |
भूलीतली भूल | शेवटली ||

--- बा भ बोरकर 

Monday, November 28, 2011

देव चोरला माझा



देव चोरला माझा देव चोरला...
भला थोरला माझा देव चोरला ...

झगमग पाहुनिया पाठ फिरवून गेला 
रोषणाईमध्ये देव माझा हरवून गेला 
नाही उरली भक्ती ... भाव नाही उरला ...
देव चोरला ...

हरवून गेले संत काल उरलेले थोडे 
पावलांचे नसे मोल आज महागले जोडे 
टेकू चरणी माथा असा कोण उरला ...
देव चोरला ....
--- मोरया (अवधूत गुप्ते )

Thursday, August 18, 2011

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव ३

तुझे गोल गोल गाल तुझे बहुमोल गाल 
तुझ्या नाजूक गालांना कुणी फासला गुलाल 

कुणी छेडले गालांना गाल गोरेमोरे झाले 
गाल लाजले साजणी गाल पाठमोरे झाले 

गाल हसले साजणी गाल रुसले साजणी 
वाट पहाता कुणाची गाल बसले साजणी 

घोळ झाला काहीतरी फार झाली काय घाई 
माझ्या ओठांना निरोप तुझा पोचलाच नाही 

माझे ओठ परेशान तुझे गाल परेशान 
गुलाबाचं  पानपान सखे झाले परेशान 

तुझा निरोप एकदा पुन्हा येऊ दे साजणी 
भेट गालाची ओठाची आज होऊ दे साजणी 

ओठ माझे साधे भोळे तुझं स्मरतील नाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव

Tuesday, August 16, 2011

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव २

तुला दुरून पाहिलं कधी झुरून पाहिलं 
तुझं डोळ्यातील रूप हाती धरून पाहिलं 

तुझं देह चंदनाचा  तुझी चांदण्याची काया
तुझं पदर उडतो जणू आभाळाची छाया 

तुझ्या रूपाचा दरारा जशी वाघीण चालली 
सारं शहारलं रान जशी नागीण चालली 

तुझी चाल नागिणीची माझे थरारते मन 
तुझा धरून पदर माझं भरारते मन 

तुझा पदर चावट त्याने ढळून पाहिलं 
मीही वळून पाहिलं जरा जळून पाहिलं 

सांग जळू असा किती? सांग जाळणार किती ?
रोज टाळतेस पुन्हा सांग टाळणार किती?

तुझी हौस टाळण्याची माझ्या उरामध्ये घाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव १

आज एक गाणे ऐकण्यात आले 'तुझ्या टपो-या  डोळ्यात माझा इवलासा गाव'. मिलिंद इंगळेनी गायलेल्या आणि ज्ञानेश वाकुडकरांनी लिहिलेल्या या गेय कविता.याचे विशेष म्हणजे यात मुखडा आहे पण तो फक्त सुरुवातीला आणि शेवटीच. मध्ये संपूर्ण कविताच आहे. २१ कवितांनी सजलेला हा अल्बम मी वेळ मिळेल तसा इथे पोस्ट करेन. त्यातली हि पहिली कविता 

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव 
तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव

तुझ्या मिठीत आकाश तुझ्या मुठीत आकाश 
माझं हवेत आकाश तुझ्या कवेत आकाश 

तुझ्या पावलांचे ठसे गडे क्षितिजापल्याड 
तुझी बहरली बाग माझं सुकलेलं झाड 

तुझी बहरली बाग तुझी चर्चा जागोजाग 
तुझा श्रावण जोरात माझ्या मनामध्ये आग 

सारं जग तुझ्यासाठी माझी आग तुझ्यासाठी 
माझी झोप तुझ्यासाठी माझी जाग तुझ्यासाठी 

जीव जागतो उगाच साद देशील म्हणून 
वाट पहातात डोळे तुझी येशील म्हणून 

तुझी चाहूल घेऊन आला पहाटेचा वारा 
मला खुणावतो वेडा तुझ्या गावचा किनारा 

हाती लागेना किनारा माझी चिखलात नाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव

दोस्त दोस्त ना रहा.


दोस्त दोस्त ना रहा
प्यार प्यार ना रहा
ज़िंदगी हमें तेरा
ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा

अमानतें मैं प्यार की
गया था जिसको सौंप कर
वो मेरे दोस्त तुम ही थे
तुम्हीं तो थे..
जो ज़िंदगी की राह मे
बने थे मेरे हमसफ़र
वो मेरे दोस्त तुम ही थे
तुम्हीं तो थे..
सारे भेद खुल गए
राज़दार ना रहा
ज़िंदगी हमें तेरा
ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा

गले लगी सहम सहम 
भरे गलेसे बोलती 
वो तुम न थी तो कौन था 
तुम्ही तो थी ..
सफर के वक्त मे पलकसे 
मोतीयोको तोलती 
वो तुम न थी तो कौन था 
तुम्ही तो थी ..
नशे की रात ढल गयी
अब खुमार ना रहा
ज़िंदगी हमें तेरा
ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा

वफा का लेके नाम जो 
धडक रहे थे हर घडी  
वो मेरे नेक नेक दिल
तुम्ही तो हो..
Mukesh
जो मुस्कुराके रह गये 
जहर की जब सुई गढी
वो मेरे नेक नेक दिल
तुम्ही तो हो..
अब किसीका मेरे दिल 
इंतजार न रहा
जिंदगी हमे तेरा 
ऐतबार न रहा ऐतबार न रहा 

दोस्त दोस्त ना रहा.. 
प्यार प्यार ना रहा.. 
--- संगम (1964)(शैलेंद्र)

Monday, August 15, 2011

मनातल्या मनात मी

Suresh Bhat
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो 

अशीच रोज नाहुनी लपेट उन्ह कोवळे 
असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे 
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

अशीच रोज अंगणी लावून वेच तू फुले 
असेच सांग लाजुनी कल्यास गुज आपुले 
तुझ्या काळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो 
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

अजून तू अजाण या कुवार कर्दळीपरी 
गडे विचार जाणत्या जुईस एकदातरी 
'दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो? ' 
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

तसा न राहिला आता उदास एकटेपणा 
तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा 
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

---- सुरेश भट

Sunday, August 14, 2011

मैं ये सोचकर उसके दर से उठा था


मैं ये सोचकर उसके दर से उठा था
के वो रोक लेगी मना लेगी मुझको

हवाओं में लहराता आता था दामन
के दामन पकड़कर बिठा लेगी मुझको

कदम ऐसे अंदाज़ से उठ रहे थे
के आवाज़ देकर बुला लेगी मुझको


मगर उसने रोका
Mohammad Rafi
न उसने मनाया
न दामन ही पकड़ा
न मुझको बिठाया
न आवाज़ ही दी
न वापस बुलाया

मैं आहिस्ता आहिस्ता बढ़ता ही आया
यहाँ तक के उससे जुदा हो गया मैं ...
---- हकीकत (१९६४)(कैफी आझमी)

Friday, April 15, 2011

साडे माडे तीन

सीधे साधे हे जीवन असते, वळण ना कुठे सरळ रस्ते 
गुंतागुंतही कुठलीच नसते, चौकटीतले नाते असते 
न सांगता न  बोलता 
मनात अलगद कशी शिरते 
गालातल्या गालामध्ये
खट्याळ ती खुद्कन हसते  
ठोका चुके हृदयाचा, प्रीतीचे हे वादळ घोंगावते 
साडे माडे तीन ... साडे माडे तीन ...
मन वेडे बेलगाम हे, वा-यावर स्वैर नाचते 
गुणगुणते गाणे ... ऐक ना 
हरपे का भान ना कळे, दिसते सगळेच वेगळे 
कसली ही जादू ...  बोल ना
होतो जीव घाबरा, शोधे तो चेहरा 
कोठे लपलीस तू ... सांग ना 
साडे माडे तीन ... साडे माडे तीन ...

-----  साडे माडे तीन

Tuesday, January 25, 2011

कधी तू...

कधी तू रिमझिम झरणारी  बरसात 
कधी तू चमचम करणारी चांदण्यात 
कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा 
बिजलीची नक्षी अंबरात 
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात 
कधी तू ....

कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी 
रातराणी वेड्या जंगलात 
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू.....

जरी तू कळले तरी ना कळणारे 
दिसले तरी ना दिसणारे 
विरणारे मृगजळ एक क्षणात 
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात
कधी तू.....  
----- मुंबई पुणे मुंबई

Saturday, July 24, 2010

कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे , 
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन्ह पडे "

प्रत्येक वर्षी श्रावण येतो ते ओठावर हे गाणे घेऊनच. तसे पाहता  मराठी महिन्याप्रमाणे श्रावण सुरु व्हायला अजून काही दिवस जायचे आहेत पण वातावरणात श्रावणाचा प्रवेश झाल्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. थोडी रिमझिम थोडी उघडीप चालू झालीच आहे . मला श्रावणाची नेहमी गम्मत वाटते म्हणजे बघा ह आज सकाळपासून पाउस थांबला होता म्हणून तिला भेटून यावे म्हंटले आणि दारातून पाय बाहेर न काढतो तोच हा मुसळधार सुरु. काल छत्री घेऊन बाहेर पडलो तर एक थेंबही आला नाही. त्याला कसे कळते असे त्रास द्यायचे.पण खरच हा त्रास आहे का ?अरे त्यामुळे तर आपल्याला भिजायची गम्मत कळते. पाउस नाही म्हणून बाहेर पडायचे... तिला भेटायचे.... तेवढ्यात पाउस सुरु... मग बोलणे लांबच... आडोसा शोधायचा... . तिच्या गालावर तोवर दोन टपोरे थेंब ओघळलेले... त्याची तारीफ करावी तर ती वळचणीतून पडणा-या पाण्याशी खेळण्यात दंग... . नंतर एवढा वेळ पावसात कुठे होतीस म्हणून आई विचारेल आता निघायला हवे  म्हंटल्यावर तिला निरोप द्यायचा.... . बर घरी भिजत एकटी कशी जाणार म्हणून स्वताच्या पैशाने रिक्षा करून द्यायची . आणि आठवणी साठवून चिंब ओले होऊन घरी परतायचे ..... खरेच दरवर्षीचा श्रावण बरेच काही देऊन जातो नाही .
अशा या श्रावणाचे वर्णन श्री सुरेश वाडकरांनी गायलेल्या या छानश्या गाण्याशिवाय पूर्ण झाले असे वाटतच नाही. मग करूया ना त्याच गाण्याने श्रावणाचे स्वागत... | 

Get this widget | Track details | eSnips Social DNA


कधी रिमझिम....
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
कधी टपो-या थेंबांचा आला ऋतू आला 
कधी पुलकित हर्षाचा, हळव्या क्षण स्पर्शाचा 
आला ऋतू आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये झुलतात गाणी दिवाणी
साद गांधाळूनी, ओल्या मातीतुनी
आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

अंग अंग स्पर्शताती मोती रुपेरी
आठवे ती अनावर भेट अधुरी 
मन चिंब ओले, शहारत बोले 
आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला

हा पाऊस वागे तुझ्यासारखा 
हा येतो नि जातो तुझ्यासारखा 
ऊन पावसाचा, खेळ श्रावणाचा 
आला ऋतू आला ऋतू आला 
कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला