गर्दन कधीच तयार होती, सुळावरती कटण्यासाठी
प्रसंग पुढचे खडे रांगेतून, क्रमाक्रमाने घटण्यासाठी
आयुष्य आमुचे इतके गांडू, उलट्या बाजूस पिळीत गेले
स्वतः नाहीतर तयार होता, पीळ कधीचा सुटण्यासाठी
--- विशाल
Monday, February 4, 2013
Monday, January 28, 2013
संस्कारांचा विंचू डसतो नित्य नव्याने आता
कुठली नीती कसले संयम, चालू मनात विकार कायम
लाज वाटते तरीही हसतो आम्ही नव्याने आता
संस्कारांचा विंचू डसतो नित्य नव्याने आता
--- विशाल
Sunday, January 20, 2013
जिथे राहिले भग्न अवशेष बाकी
वदे कोण त्या राउळाची कथा ..
पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे
न ओळखे परी देवतेची व्यथा ...
--- विशाल
Sunday, January 13, 2013
कधीतरी हल्ली सहज जाता नजर चंद्राकडे
चांदण्यातील आठवणींशी चालू होती पुन्हा लढे
पुन्हा तीच ती ओढा-ताण पुन्हा तीच ती रस्सी-खेच
जुन्याच जखमा नव्या वेदना सोसायाच्या एकटयानेच
--- विशाल
Subscribe to:
Posts (Atom)
