नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।
समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।
।। भारत माता की जय ।।
Saturday, November 30, 2013
Wednesday, August 14, 2013
जुन्या आठवांचे पाश तोडयलादेखील शब्द नाहीत
दूर जाणाऱ्या तिला पास ओढायलादेखील शब्द नाहीत
काय गुन्हा घडला ? का शब्दांनी पाठ फिरवली ?
रुसल्या शब्दांची समजूत काढायलादेखील शब्द नाहीत
--- विशाल
दूर जाणाऱ्या तिला पास ओढायलादेखील शब्द नाहीत
काय गुन्हा घडला ? का शब्दांनी पाठ फिरवली ?
रुसल्या शब्दांची समजूत काढायलादेखील शब्द नाहीत
--- विशाल
Sunday, June 9, 2013
आई
अस्तित्व नष्ट कराया
मी हळूच पांघरून घेतो
आईची हळवी माया
ती पैलावरती माया
ऐलावर होते रात
ठेवता उशीवर डोके
केसातून फिरतो हात
का डोळ्यामध्ये आसू
का अंतर्मन व्याकूळ
गगनात भारली प्रतिमा
अस्पष्ट करतसे धूळ
झाकल्या पदराखाली
आयुष्याचे कोंदण
आईच्या हातावरती
एक पिंडीचे गोंदण
हातात चंद्र धरून
स्वप्नात भेटते आई
घेऊन कुशीत मजला
गाते अजूनही अंगाई
--- विशाल
अदृश्य मिठी
पाउस थेंब थेंबाने
पानावरुनी ओघळतो
अस्तित्व उदासीन माझे
आज झुगारून देतो
कोसळत्या धारातून
क्षितिजावर दिसे न काही
अंतरात डोकावुनी
भिजलेला सूर आठवतो
ओला रस्ता ओले मन
ओली सांज प्रेमही ओले
रुततात जीवाला ओल्या
चिमणीचे व्याकुळ डोळे
सरतात मुक्याने आता
नात्यांचे दंश विषारी
त्या नाग घळीतून रात्री
फुत्कार निनावी घुमतो
एकाकी रात्र आताशा
मळभाची घेऊन चादर
सत्याला स्वप्न म्हणून
अदृश्य मिठीत मी शिरतो
--- विशाल
पानावरुनी ओघळतो
अस्तित्व उदासीन माझे
आज झुगारून देतो
कोसळत्या धारातून
क्षितिजावर दिसे न काही
अंतरात डोकावुनी
भिजलेला सूर आठवतो
ओला रस्ता ओले मन
ओली सांज प्रेमही ओले
रुततात जीवाला ओल्याचिमणीचे व्याकुळ डोळे
सरतात मुक्याने आता
नात्यांचे दंश विषारी
त्या नाग घळीतून रात्री
फुत्कार निनावी घुमतो
एकाकी रात्र आताशा
मळभाची घेऊन चादर
सत्याला स्वप्न म्हणून
अदृश्य मिठीत मी शिरतो
--- विशाल
Subscribe to:
Posts (Atom)