Friday, April 15, 2011

साडे माडे तीन

सीधे साधे हे जीवन असते, वळण ना कुठे सरळ रस्ते 
गुंतागुंतही कुठलीच नसते, चौकटीतले नाते असते 
न सांगता न  बोलता 
मनात अलगद कशी शिरते 
गालातल्या गालामध्ये
खट्याळ ती खुद्कन हसते  
ठोका चुके हृदयाचा, प्रीतीचे हे वादळ घोंगावते 
साडे माडे तीन ... साडे माडे तीन ...
मन वेडे बेलगाम हे, वा-यावर स्वैर नाचते 
गुणगुणते गाणे ... ऐक ना 
हरपे का भान ना कळे, दिसते सगळेच वेगळे 
कसली ही जादू ...  बोल ना
होतो जीव घाबरा, शोधे तो चेहरा 
कोठे लपलीस तू ... सांग ना 
साडे माडे तीन ... साडे माडे तीन ...

-----  साडे माडे तीन

No comments:

Post a Comment