गणेशोत्सवात
हल्ली गणपतीची सिनेमाच्या
तालावरची फुटकळ गाणी ऐकली
कि मला अजूनही
तिच्या त्या गाण्याची
आठवण येते. २५
वर्षे झाली तरी
अज्जिबात पुसट न
झालेल्या त्या सुरात
काय जादू होती
काय माहित. प्राथमिक
शाळेचा वर्ग भरलेला
असायचा. १० ते
५ ची शाळेची
वेळ असायची. अभ्यासाचे
विषय ४ पर्यंत
संपवून एक तासात
बाई अभ्यासेतर गोष्टी
करून घ्यायच्या. (त्यावेळी
madam म्हणायची पद्धत निदान मराठी
शाळांमध्ये तरी चालू
व्हायची होती.) त्यात
प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक
असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी,
विनोद, कोडी, सामुहिक कविता,
वक्तृत्व किंवा गाणी असायची.
अर्धवट लक्ष त्याकडे
आणि अर्धवट लक्ष
बाहेरच्या घंटेकडे आणि न्यायला
आलेल्या पालकांकडे असायचे आणि
अशातच तिचे ते
गाणे चालू व्हायचे
-
"सारेगमप
मपधनिसा,
मंत्रमुग्ध
अवतार मंत्रमुग्ध अवतार
…. "
त्यावेळी पडद्यावरचे गाणे जुही
किंवा माधुरी म्हणते
अशी आमची दाट
समजूत होती आणि
लता आणि आशा
या शास्त्रीय संगीत
गाणाऱ्या गायिका आहेत असा
गैरसमजही होता. गाणे नाचणे
संगीत हे मुलींचे
कार्यक्षेत्र असे वाटायचे.
त्यामुळे त्यात त्यावेळी जास्त
रस घेत नसलो
तरी वर्गातील एकमेव
गायिका आणि शिवाय
पुढे उभे राहून
बिनधास्त गाणे म्हणते
म्हणजे नक्की मोठेपणी सिनेमात
हिरोइन होणार असेही मनात
यायचे. असो पण
तरी तिने सूर
लावला कि आपोआप
डोक्यात त्याचे संगीत सुरु
व्हायचे
त्यावेळी या शब्दांचे
अर्थ हि माहित
नव्हते. लय ताल
सप्तसूर आलाप इतकेच
काय तर या
गाण्याची मूळ गायिका
लता / उषा मंगेशकर
आहे आणि अष्टविनायका
मधील मयुरेश्वरावर हे
गाणे लिहिले आहे
हे कळायला पुढच्या
दहा वर्षाचा काळ
उलटावा लागला. नंतर शाळा
बदलल्या संपर्क लोप पावले
(असेही त्यावेळी तरी कुठे
मुलींशी फार बोलायला
जमायचे म्हणा ) पण अजूनही
गणपती म्हणले कि
पहिले गाणे आठवते
ते हेच आणि
कानात आवाज घुमतो
तिचाच.
(गीताचे बोल लिहिताना
काही चुकले असल्यास
क्षमस्व.)
तिच्यापर्यंत
हा लेख पोचेल
तिला सगळे आठवेल
इतर वर्गमित्रांना काही
आठवेल याबाबत तशी
शंकाच आहे. पण
बालपणीच्या या सुंदर
आठवणीसाठी तिला या
लेखाद्वारे धन्यवाद म्हणावेत यासाठीच
हा प्रपंच
--- विशाल
No comments:
Post a Comment