"५.३० पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया"
"अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले "
"६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला "
"७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला .. आज राहू दे नाष्टा"
"साला ५ मिनट झाले ७.३५ ची बस अजून आली नाही "
"साला २ मिनट आधी पोचलो असतो तर ७.५९ बदलापूर सापडली असती "
"नालायक लोक १ मिनट वाट पहात नाहीत, लगेच गाडी सोडतात"
"१२ ला जेवण आणायला गेला आहे ऑफिस बॉय १.३० वाजला अजून आला नाही "
"बॉस आज ५ मिनिट लवकर गेला तर आपल्याला टाईमात ६ वाजता निघता येईल "
"अरे जायच्या १ मिनिट आधी काम आठवते साल्यांना, आजपण ६.१९ सुटणार वाटत"
"अरे १/२ तास ट्राफिक मध्ये अडकलोय आज घरी पोचायला ९ च वाजणार"
"१०.३० झाले .. जेवण करून येऊ नाहीतर मेस बंद होईल"
"१२ वाजले झोपले पाहिजे .. नाहीतर उद्या परत उठायला उशीर "
"५.३० पहिला गजर झाला........
----- विशाल
No comments:
Post a Comment