माझ्या कराडच्या गौरवशाली परंपरेत कृष्णा नदी किनारी विराजमान मारुती मंदिराचे स्थान काही औरच आहे .. तेथे पूर्वी हिंदू धर्मातील मृतदेहांचे अंतिम संस्कार होत असत म्हणून त्याला 'मढ्या मारुती' नाव पडले पण त्यास अंतिम संस्कारानंतर मृतात्म्यास शांती मिळवून देणारा 'मोक्ष मारुती' म्हणणे जास्त योग्य वाटते. आता काही धरण प्रकल्पांमुळे ते देऊळ कायमस्वरूपी पाण्यात जाणार आहे असे दिसते. कराड शहराशी अनेक भावनांनी जोडलेल्या या मंदिराबाबत, या मारुतीबाबत काही भावना कदाचित अशाही असतील ...
देऊळ बुडे देवासह
वाढले नदीचे पाणी
जळत्या प्रेतांचे डोळे
दिसती उदासवाणी ..
हनुमंत उभा बाजूस
नव्हतीच भीती राखेला
त्यानेही कधी न पुसले
माणूस कोणता मेला ..
हर एक देह चिंतेत
मोक्षास करावे काय ?
उडवून राख शेवटला
धरणार कुणाचे पाय ?
------ विशाल
.
------ विशाल
.
No comments:
Post a Comment