Thursday, August 18, 2011

तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव ३

तुझे गोल गोल गाल तुझे बहुमोल गाल 
तुझ्या नाजूक गालांना कुणी फासला गुलाल 

कुणी छेडले गालांना गाल गोरेमोरे झाले 
गाल लाजले साजणी गाल पाठमोरे झाले 

गाल हसले साजणी गाल रुसले साजणी 
वाट पहाता कुणाची गाल बसले साजणी 

घोळ झाला काहीतरी फार झाली काय घाई 
माझ्या ओठांना निरोप तुझा पोचलाच नाही 

माझे ओठ परेशान तुझे गाल परेशान 
गुलाबाचं  पानपान सखे झाले परेशान 

तुझा निरोप एकदा पुन्हा येऊ दे साजणी 
भेट गालाची ओठाची आज होऊ दे साजणी 

ओठ माझे साधे भोळे तुझं स्मरतील नाव 
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव

No comments:

Post a Comment