Saturday, August 7, 2010

दादांची मिश्किली

 मध्यंतरी श्री दादा कोंडके यांचे 'सोंगाड्या' हे आत्मचरित्र वाचनात आले. आपल्यावर सतत होणारा द्वयर्थी विनोदाचा आरोप खोडून काढताना दादांनी अत्यंत समर्पक उदाहरणे देऊन आपल्या हजरजबाबीपणाची प्रचीती दिली आहे. ते म्हणतात ---
मोठमोठ्या कवींना शब्दांची गम्मत करण्याचा मोह आवरलेला नाही. मोरोपंत हे महान कवी होते कि नाही ? होतेच . त्यांच्या आर्या अतिशय गाजलेल्या आहेत कि नाही ? आहेतच . मग त्यांनीच केलेल्या एका आर्येचे उदाहरण घेऊ या ..
.
" स्व स्त्री घरात नसता कंडू शमनार्थ रंडीरा खावी |
   ती हि नसता , स्वहस्ते चीबुल्ली दाबावी || "
.
आता यात थोडे संस्कृत आहे म्हणून अर्थ सांगितला पाहिजे . कंडू म्हणजे खोकला आणि रंडीरा म्हणजे खडीसाखर . अर्थ असा आहे कि स्वत:ची बायको घरात नसली आणि खोकला आला तर काय करावं ? तर खडीसाखर खावी . तीही म्हणजे खडीसाखर घरात नसली तर चीबुल्ली म्हणजे कंठमणी . तो हाताने थोडा दाबावा . अर्थ किती सरळ सोपा आहे  कि नाही ? पण याच आर्येतील 'रंडीरा' या शब्दातला 'रा' जर पुढच्या शब्दाला जोडला आणि 'चीबुल्ली' मधला ची जर आधीच्या शब्दाला जोडला तर काय अर्थ होईल ? मी तो सांगायची गरज नाही. आपल्या सगळ्यांना तो कळू शकतो.मोरोपंत सारख्या जाड्या विद्वानाने अशी शब्दांची गम्मत का करावी ? तर त्यात मजा आहे म्हणून . हि जी मजा आहे ती आयुष्यात गम्मत आणते 
.
आता एका गो-या  कवीची गम्मत पहा . गो-या चमडीच सगळ चांगल वाटत म्हणून सांगतोय 
.
एक तरुणी म्हणते .........

त्याने मला सोफ्यावर निजवून प्रयत्न केला ,

खुर्चीवर बसवून प्रयत्न केला ,

खिडकीच्या कठड्यावर बसवून त्याने जमत का ते पहिले ,

पण त्याला यश आलं नाही .......

मग त्याने मला खाटेवर झोपवून प्रयत्न केला ,

मला भिंतीला टेकवून उभी केली ,

मी जमिनीवर बसलेदेखील , पण तरीही जमेना ,

त्याने असा प्रयत्न करून पहिला ,

त्याने तसा प्रयत्न करून पहिला ,

पण जमेचना .....

खरोखर हसून हसून माझी मुरकुंडी वळली ,

त्याची ती धडपड पाहून ,

माझा फोटो काढण्याची .........
.
आहे कि  नाही गम्मत ? गंमतीच असंच असत . ती आपल्या मनात असते . करणा-याच्यात असतेच असे नाही .
----- दादा कोंडके (सोंगाड्या)

कुसुमाग्रज

दानवीकरण घडते वारंवारतेने 
देवदूतीकरणासाठी मात्र 
करावी लागते प्रतीक्षा दीर्घकाल 
त्या एका आश्वासनावर 
भिस्त ठेऊन -
           " संभवामि युगे युगे "
                             ------- कुसुमाग्रज 

Friday, August 6, 2010

कृष्णएकांत

तिच्या अंगणात प्राजक्त बंदी तरी सत्यभामे ढळे तोल का ?
झाडाप्रमाणे असे झाड हेही असे सांगते ती ,तरी हुंदका ?
इथे बासरीच्या गडे आतड्याला हवा चंदनी लाकडाची नवी;
तुला रुक्मिणी का फुले वेचताना सुगंधात हि भेटते वाळवी ?
संहार आता करा यादवांचे जुनी राजधानी रिकामी करा ;
रथाला कुणी अश्व देऊ नका अन शिरच्छेद माझे कसे हि धरा
वैराण आयुष्य झाले तरीही फुलांना कुणी बोल देऊ नये;
मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या गवाक्षातला चंद्र झाकू नये .
नको धाक घालू नको हाक तोलू इलाख्यातली गुप्त झाली नदी ;
निजेच्या भयाने जसा शुभ्र होतो खुनाच्या कटातूनहि  पारधी .
जिथे कृष्णएकांत देठात प्राजक्त राधेस हा रंग येतो कसा ?
सर्वेश्वराला कधी या मुलीने न मागितला रे तिचा आरसा .

------- ग्रेस 

Sunday, August 1, 2010

Happy Friendship Day

आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार . Friendship  Day   खरे तर मला एक समजत नाही मैत्रीसाठी हा एकच दिवस विशेष का मनवायाचा ? मैत्री तर आयुष्यभरासाठी असते ना ? मग ? पण आजच्या दिवशी येणारे message   पाहिले कि कळते. हा दिवस जवळच्या मित्रांसाठी नसून जे लांब आहेत म्हणजे जे वर्षभर संपर्क करत नाहीत पण यादिवशी आपली मैत्री अशी आहे तशी आहे वगैरे संदेश पाठवतात त्यांच्यासाठी हा दिवस विशेष आहे . जाऊ  दे आहे तर आहे 
जो बोता है वो पाता है अपने बाप का क्या जाता है 
.
पण तरीही यादिवशी जेव्हा संपूर्ण जग Happy Friendship Day  चा नारा लावत आहे आपण एक कविता तर पोस्ट करू शकतोच ना 
(खास माझ्या मित्रांसाठी : मंगल , मंगेश ,सौगंध , चिराग , इरफान, अपर्णा आणि वगैरे वगैरे )  
.
जेव्हा ओसाड भासू लागते गजबजलेले गाव ,
उलटे पडतात सगळेच फासे उधळून जाती डाव ,
प्रेम नाती सा-यांचा होतो झूठा बनाव ,
स्वतालाच लागत नाही स्वताचाच ठाव ,
मलम ही पडते अपुरे भराया जेव्हा हृदयीचे घाव ,
अशावेळी ओठी येते मित्रा फक्त तुझे नाव ...
------विशाल