Sunday, July 31, 2011

दोघे एकाच छत्रीमधुनी, 
धो धो पाउस वहात असावा, 
कमनीय तुझ्या त्या कटीभोवती
माझा डावा हात असावा,

चिंब चिंब या सरीत भिजुनी 
ठिणगी अवघी पेटत जावी,
तू सोबत असताना सखये 
नित्य अशीच बरसात व्हावी ...
--- विशाल 

Wednesday, July 27, 2011


पाउस थेंब थेंब
तुही तशात लांब
विरहाच्या धगीत आता
वितळतो ओला खांब

तू जरा बाजूला थांब
नको भिजूस ओली चिंब
पाण्यात लागली आग
होईल की बोंबाबोंब 

--- विशाल

याद

आली याद पुन्हा जुनी जीवघेणी,
स्मरावे किती? विस्मरावे किती ?


घालावा कोणी या हृदयास आवर
पुरावे किती ? अन दुरावे किती ?


तुझी ओढ कैसी समुद्रापरी गे 
भरावे किती? अन उरावे किती ?


आता वेग तुटले नि आवेग सुटले 
झुरावे किती ? सावरावे किती ?


उभे पीक आले आता कापणीला
दावे किती ? आगलावे किती ?

कळतील का मज तुझे हे इशारे
पास यावे किती ? अंतरावे किती ?

-- विशाल