Sunday, October 28, 2012

मन वेडे मन कुणालाही न कळते रे


मन कधी हे बहरून येते, मन कधी कोमेजून जाते 
मन कधी फांदीवर झुलते रे 
मन कधी हे बावरलेले, मन कधी हे हिरमुसलेले 
मन कधी हे उमलून येते रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे ||

मन सागर हे, मन हे वारा, मन निर्झर हे, मन हे धारा 
मन देवाची नाजूक कविता रे 
सांगुनी क्षण गेला रे, भर मनाचा पेला रे 
बघ नशा जगण्याची चढते रे 
का मनाला शिणवावे, का उगाचच अडवावे 
रे मनावीन काही न घडते रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे || 

मन हे आशा मन निराशा, मन असे जगण्याची भाषा 
जग हे सारे मनी नांदते रे 
चल मनाला सोबत घेऊ, ईश्वराशी बोलून येऊ 
तो अलबेला मनात रमतो रे 
मन झुरे तर तोही झुरतो, मन हसे तर तोही हसतो 
मन कळे त्या ईश्वर कळला रे 
मन वेडे मन कुणालाही न कळते रे || 

---संदीप खरे (movie - कशाला उद्याची बात 2012) 

Wednesday, October 24, 2012

 मला जेव्हा जेव्हा वाटायला लागते कि "i m perfect" तेव्हा तेव्हा तो अशी परिस्थिती निर्माण करतो जेणेकरून मला जाणीव व्हावी "NO ! u r NOT ",
आणि लोक समजतात चुका मी करतो.
---- विशाल

Tuesday, October 23, 2012

उकळलेल्या पाण्याला चहा आणि निथळलेल्या स्पर्शाला प्रेम म्हणणाऱ्याच्या संसारात वाद कधीच होत नाही.. पण म्हणून त्याला सुखी म्हणायचे का ?
--- विशाल 

Thursday, October 11, 2012

एक मुलगी आहे पाहण्यात तीला सांगू कसे ?
नाही मजा एकटे राहण्यात तीला सांगू कसे ?
भेटण्या बोलण्याचा सारा एकच निघे अर्थ 
पण हे रोज नव्या बहाण्यात तीला सांगू कसे ?
--- विशाल 

Saturday, October 6, 2012

आखरीमे काम आए 
सिर्फ कंधे चार के..
मागुनी जे चालले तेही त्रयस्थासारखे..

इक हसी देखी थी लब ने
इक दुवा भेजी थी रब ने
क्षणभरीचा खेळ पुन्हा जाहलो ना पोरके

--- विशाल 

Friday, October 5, 2012

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....
"५.३०  पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया"
"अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले "
"६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला "
"७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला .. आज राहू दे नाष्टा"
"साला ५ मिनट झाले ७.३५ ची बस अजून आली नाही "
"साला २ मिनट आधी पोचलो असतो तर ७.५९ बदलापूर सापडली असती "
"नालायक लोक १ मिनट वाट पहात नाहीत, लगेच गाडी सोडतात"
"१२ ला जेवण आणायला गेला आहे ऑफिस बॉय १.३० वाजला अजून आला नाही "
"बॉस आज ५  मिनिट लवकर गेला तर आपल्याला टाईमात ६ वाजता निघता येईल "
"अरे जायच्या १ मिनिट आधी काम आठवते साल्यांना, आजपण ६.१९ सुटणार  वाटत"
"अरे १/२ तास ट्राफिक मध्ये अडकलोय आज घरी पोचायला ९ च वाजणार"
"१०.३० झाले .. जेवण करून येऊ नाहीतर मेस बंद होईल"
"१२ वाजले झोपले पाहिजे .. नाहीतर उद्या परत उठायला उशीर "
"५.३०  पहिला गजर झाला........
----- विशाल