मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन
मी पाठ फिरवुनी चालत गेलो दूर
कधी मनास भिडला नाही व्याकुळ सूर
का आज बंधने तोडून आला पूर
जे कधीच नाही दिसले ते पाहीन
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन
तुटले पुरती मी तरी धावते आहे
पापणीत ओल्या उगाच हसते आहे
मन पुन्हा पुन्हा पण मला सांगते आहे
एकटीच होते एकटीच राहीन
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन
कुणी बुवा मांडतो खेळ इथे श्रद्धेचा
देहाचा कुणी मायेचा कुणी सत्तेचा
मज ठाऊक एकच मालक या जगताचा
त्या ईश्वरास मी रातंदिन शोधीन
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन
धावतो कशाच्या मागे मी तोडून सारे धागे
काळोख सरेना मज वाट दिसेना
दिसले सुख जे दुरुनी फिरुनी लपले
क्षण एक सुखाचा दैवाला मागेन
मी आज कुठे अन कुठे उद्या जाईन
---- विठ्ठल विठ्ठल