आज एक गाणे ऐकण्यात आले 'तुझ्या टपो-या डोळ्यात माझा इवलासा गाव'. मिलिंद इंगळेनी गायलेल्या आणि ज्ञानेश वाकुडकरांनी लिहिलेल्या या गेय कविता.याचे विशेष म्हणजे यात मुखडा आहे पण तो फक्त सुरुवातीला आणि शेवटीच. मध्ये संपूर्ण कविताच आहे. २१ कवितांनी सजलेला हा अल्बम मी वेळ मिळेल तसा इथे पोस्ट करेन. त्यातली हि पहिली कविता
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव
तुझी झेप वादळाची माझी तुझ्यावरी धाव
तुझ्या मिठीत आकाश तुझ्या मुठीत आकाश
माझं हवेत आकाश तुझ्या कवेत आकाश
तुझ्या पावलांचे ठसे गडे क्षितिजापल्याड
तुझी बहरली बाग माझं सुकलेलं झाड
तुझी बहरली बाग तुझी चर्चा जागोजाग
तुझा श्रावण जोरात माझ्या मनामध्ये आग
सारं जग तुझ्यासाठी माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी माझी जाग तुझ्यासाठी
जीव जागतो उगाच साद देशील म्हणून
वाट पहातात डोळे तुझी येशील म्हणून
तुझी चाहूल घेऊन आला पहाटेचा वारा
मला खुणावतो वेडा तुझ्या गावचा किनारा
हाती लागेना किनारा माझी चिखलात नाव
तुझ्या टपो-या डोळ्यात माझं इवलसं गाव
No comments:
Post a Comment