तुझे लांब लांब केस तुझी लांब लांब वेणी
तुझ्या केसामध्ये माझं मन गुंतलं साजणी
जीव गुंतला केसात मन गुंतलं गुंतलं
तुझ्या सौंदर्याच त्यात धन गुंतलं गुंतलं
सखी चालतेस तेव्हा वेणी ऐटीत हालते
खुल्या माळावर जशी कुणी नागीण डोलते
हिला ठेऊ नको मागे सखे तिला पुढे टाक
धन पडले समोरी असो चोरावर धाक
सखे नाही भरवसा कुणी कुठून येईल
तुझ्या सौंदर्याच धन कोणी लुटून नेईल
लाख मोलाच साजणी तुझ्या रूपाच हे धन
तुझी वेणी टाक पुढे तिला करू दे राखण
आम्ही फुकटात किती त्याच्याकडे लक्ष द्यावं
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलस गाव ..