Showing posts with label चारोळी. Show all posts
Showing posts with label चारोळी. Show all posts

Monday, July 16, 2018

अशी पावसाची हि सर कोसळावी
तिची पाठमोरी मिठी घट्ट व्हावी
असे काही व्हावे कळावे ना क्षणभर
सरावे ना अंतर उरावे ना अंतर

Wednesday, March 7, 2018

आदमीका वक्त बुरा हो मगर इतनाभी नही गालिब
की हम चुहा मारना चाहते हो और तू नजर आ जाये
- विशाल

Wednesday, July 6, 2016

कोई नहीं यहांपे होश-ओ-हवासोमे, आधे सांजोमे गये और आधे नमाजोमे
दिलपे गुजरी है तो फिर दिलकी ही बोली बोलो, क्या रक्खा है चंद उधार के अल्फाजोमे

-- विशाल

Monday, June 13, 2016

तर्क - ए - मय ही समझ इसे नासेह
इतनी पी है कि पी नही जाती
--- शकील बदायुनी



समज हेच कि आहे दिली मी सोडूनी दारू
पिली आधीच एवढी आता अजुनी पिणे नाही
--- विशाल

Wednesday, August 14, 2013

जुन्या आठवांचे पाश तोडयलादेखील शब्द नाहीत
दूर जाणाऱ्या तिला पास ओढायलादेखील शब्द नाहीत
काय गुन्हा घडला ? का शब्दांनी पाठ फिरवली ?
रुसल्या शब्दांची समजूत काढायलादेखील शब्द नाहीत
--- विशाल

Saturday, June 8, 2013

सजलेल्या मौसमाची चढलेली धुंदी
कोसळत्या पावसाची आहे रजामंदी
पण
बांधलेले हात माझे, हुकलेली संधी
चिंब तू समोर, मला पहायची बंदी

Monday, February 4, 2013

गर्दन कधीच तयार होती, सुळावरती कटण्यासाठी 
प्रसंग पुढचे खडे रांगेतून, क्रमाक्रमाने घटण्यासाठी
आयुष्य आमुचे इतके गांडू, उलट्या बाजूस पिळीत गेले
स्वतः  नाहीतर तयार होता, पीळ कधीचा सुटण्यासाठी 
--- विशाल   

Monday, January 28, 2013

चांगुलपणाचा फटका बसतो नित्य नव्याने आता 
संस्कारांचा विंचू डसतो नित्य नव्याने  आता 
कुठली नीती कसले संयम, चालू मनात विकार कायम 
लाज वाटते तरीही हसतो आम्ही नव्याने आता 
संस्कारांचा विंचू डसतो नित्य नव्याने  आता
--- विशाल 

Sunday, January 20, 2013

जिथे राहिले भग्न अवशेष बाकी 
वदे  कोण त्या राउळाची कथा ..
पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे 
न ओळखे परी देवतेची व्यथा ...
--- विशाल 

Sunday, January 13, 2013

कधीतरी हल्ली सहज जाता नजर चंद्राकडे 
चांदण्यातील आठवणींशी चालू होती पुन्हा लढे 
पुन्हा तीच ती ओढा-ताण पुन्हा तीच ती रस्सी-खेच 
जुन्याच जखमा नव्या वेदना सोसायाच्या एकटयानेच 
--- विशाल  

Friday, January 11, 2013

"जपावे किती मी तुझ्या आठवांना 
नि स्वप्नांस तुझिया किती गोंजरावे ,
आसवांवरी तू नाव कोरले तुझे म्हणुनी  
पापणीत ओल्या कुठवरी सांभळावे
--- विशाल 

Thursday, January 3, 2013

नात्यातील चुकलेली गणिते 
उरलेल्या बाक्या काही 
आयुष्य उभे वेचले तरी 
अजूनही उत्तर नाही 
--- विशाल 

Wednesday, December 5, 2012

तोडून गळ्यातील धागा, फोडून काळे खडे 
प्रिये ये ना पुन्हा ... परतून माझ्याकडे ..
---- विशाल 

Saturday, December 1, 2012

रागावलेली एक कळी , तिचे फुगलेले गाल 
गालावरची चुटूक खळी  अजूनच लाल 
हसू नाही रुसू नाही फक्त ओठी हुप्प 
चार महिने झाले भांडून तरी अजून गप्प ?
--- विशाल 

Wednesday, November 14, 2012

एक सुरी, जी थेट उरी
पण मुठीवर तिचा हात ,
कळ कसली ? ही जखम असली
हातून तिच्या ....
.... क्या बात ?
--- विशाल

Thursday, October 11, 2012

एक मुलगी आहे पाहण्यात तीला सांगू कसे ?
नाही मजा एकटे राहण्यात तीला सांगू कसे ?
भेटण्या बोलण्याचा सारा एकच निघे अर्थ 
पण हे रोज नव्या बहाण्यात तीला सांगू कसे ?
--- विशाल 

Saturday, October 6, 2012

आखरीमे काम आए 
सिर्फ कंधे चार के..
मागुनी जे चालले तेही त्रयस्थासारखे..

इक हसी देखी थी लब ने
इक दुवा भेजी थी रब ने
क्षणभरीचा खेळ पुन्हा जाहलो ना पोरके

--- विशाल 

Tuesday, May 22, 2012

आम्ही गांडू कोणासोबत भांडू शकलो नाही 
प्रेम केले पण त्यालासुद्धा मांडू शकलो नाही 
बाता मोठ्या वाफा मोठ्या हवेत विरुनी गेल्या 
रडलो मेलो पण चौकटीस ओलांडू शकलो नाही 
--- विशाल 

Tuesday, January 31, 2012

भेसूर शांतता आजही तिच्या गावी 
कि जोखड मनात कुठवर मीच वहावी
हे गाव तिचे हेही मी विसरून गेलो 
मग ऐकू येते कुठली हाक निनावी 
--- विशाल 

Tuesday, November 29, 2011

महासागराच्या क्षितिजावर मावळती देतसे साद 
जे बुडाले डबक्यामध्ये ... त्यांचे बुडणेही बरबाद 
---विशाल