आम्हा श्रेष्ठत्वाचा कधीच नाही मोह,
चार ओळीने व्यापतो आमचा
"आनंद डोह ..."
Friday, November 30, 2012
'लोचा' आणि 'गोची' अशी नावे असणाऱ्या मुलांच्या वडिलांनी या नावाचे रहस्य शेवटी सांगितले ते असे..
"खरेतर यांच्या आईशी मला लग्नच करायचे नव्हते पण तिला दिवस गेले त्यामुळे माझी मोठी 'गोची' झाली ..
आणि मी दोन वर्ष घरापासून दूर असताना तिला पुन्हा दिवस गेले .. त्याच दरम्यान हा 'लोचा' झाला असावा ..."
---- joke created by विशाल जिरंगे
Saturday, November 17, 2012
कुठे एक दिवा पेटला नसता कि कुठे एक तोंड गोड झाले नसते, यम कदाचित दाराशी येऊन थांबला असेल तरी साहेब म्हणाले असतील "मला माहित आहे तू मला न्यायला आला आहेस पण अजून दोन दिवस थांब यमा , वर्षभर नाना त्रासांनी गांजलेल्या माझ्या त्रस्त महाराष्ट्राला, माझ्या गरीब शिवसैनिकाला निदान दिवाळीनिमित्त दोन दिवस आनंद साजरा करू दे , सर्व दु:ख विसरून सुखाने तोंड गोड करू दे, भावांना ओवाळणा-या माझ्या मराठी बहिणींच्या चेह-यावरचे हसू एकदा शेवटचे पहातो आणि मग मी स्वत तुझ्यासोबत येतो." आयुष्यभर ते वाघासारखे लढले. अनेक शत्रू परास्त केले आणि त्यावर शिरपेच म्हणून कि काय अखेरच्या क्षणी बाजीप्रभूंच्या धडाडीने प्रत्यक्ष मरणास खिंडीत अडवून धरले कि महाराष्ट्राची दिवाळी साजरी होऊ दे.... मी शिवाजी महाराजांना पहिले नाही, मी बाजीप्रभूंना पहिले नाही पण आज मी म्हणू शकतो मी बाळासाहेबांना पाहिले ... भरून पावलो ....
--- विशाल (१८/११/२०१२)
Wednesday, November 14, 2012
एक सुरी, जी थेट उरी
पण मुठीवर तिचा हात ,
कळ कसली ? ही जखम असली
हातून तिच्या ....
.... क्या बात ?
--- विशाल