Tuesday, January 31, 2012
Friday, January 6, 2012
दुनियेची रीत
नकोशी तरी वेदना ती द्यावयास ये
ये जवळ... भले पुन्हा दूर जावयास ये
वेड्या दिलास अजून एक आस यायची
अखेरची ती ज्योतही विझवावयास ये
सरली युगे चाखुनी फळ दु:खवृक्षाचे
कामना ही कर पुरी... रडवावयास ये
थोडा तरी या माझिया प्रेमास मान दे
तुही कधीतरी मला भेटावयास ये
कारणे विरहाची मी देऊ कुणाकुणाला ?
नाराज का ? दुनियेस हे सांगावयास ये
प्रेम लपविणे भाग प्रेमाचा... मान्य आहे
हळूच कधी सोबतीने शोधावयास ये
तसा करार नाही लिखित पण तरीही
दुनियेची रीत पार तू पाडावयास ये
येतात तुला सारे न येण्याचे बहाणे
ये एकदा अशी... कधी न जावयास ये
---विशाल (भावानुवाद)
(मूळ गझल (उर्दू) : रंजिश ही सही - अहमद फराज )
http://www.youtube.com/watch?v=tXraOxI830U
---विशाल (भावानुवाद)
(मूळ गझल (उर्दू) : रंजिश ही सही - अहमद फराज )
http://www.youtube.com/watch?v=tXraOxI830U
Subscribe to:
Posts (Atom)