Tuesday, April 12, 2011

तीची आठवण

उठल्या उठल्या नाव प्रभूचे
घेण्याआधी जी भरते मन ... तीची आठवण

सांजवेळीला गर्दीतही का 
देऊन जाते एकाकीपण ... तीची आठवण

विस्मरणांचे चालू रण पण 
व्यूह टाकते सारे भेदून ... तीची आठवण

मी वर वर पोलादी पत्थर 
हृदय परंतु कातर कारण ... तीची आठवण

सुखात असते सदा साथ अन 
दु:खालाही  होते कोंदण ... तीची आठवण

कधी जाळते ग्रीष्म झळेसम 
कधी मोहरून जाते कणकण ... तीची आठवण 

छळून जाते बनून रावण 
भासे तरी गंगेहून पावन ... तीची आठवण

--- विशाल 

No comments:

Post a Comment