Sunday, May 26, 2013

उत्तुंग पातळीचे वैज्ञानिक ऋषीमुनी सहस्रो वर्षांपूर्वी विज्ञानाच्या भाषेत चर्चा करणारे ऋषी !
अतीसूक्ष्म कालगणनेचा अभ्यास असणारे भारतीय ऋषी !
वेदकालानंतर अतीविशाल आणि अतीसूक्ष्म अशी कालगणना भारताने केली. ती महाभारत, पुराणे इत्यादि ग्रंथात समाविष्ट केलेली आढळते. श्रीमद्भागवत पुराणात ३/११ येथे पुढीलप्रमाणे कोष्टक दिलेले आहे.
१ अहोरात्र = ८ प्रहर = २४ तास
१ अह = १ रात्र = ४ प्रहर = १२ तास
६ नाडिका = १ प्रहर = ३ तास
२ नाडिका = १ मुहूर्त = १ तास = ६० मिनिटे
१५ लघु = १ नाडिका = ३० मिनिटे
१५ काष्ठा = १ लघु = २ मिनिटे = १२० सेकंद
५ क्षण = १ काष्ठा = ८ सेकंद
३ निमेष = १ क्षण = १.६ सेकंद
३ लव = १ निमेष = ०.५३ सेकंद
३ वेध = १ लव = ०.१७ सेकंद
१०० त्रुटि = १ वेध = ०.०५६ सेकंद
३ त्रसरेणु = १ त्रुटि = ०.०००५६ सेकंद
३ अणु = १ त्रसरेणु = ०.०००१९ सेकंद
२ परमाणु = १ अणु = ०.००००६३ सेकंद
१ परमाणु = ०.००००३२ सेकंद
श्रीमद् भागवताचा काळ इसवीसनपूर्व १ सहस्र ६५२ वर्षे आहे. तीन सहस्र वर्षांपूर्वी सेकंदाचा दशलक्षांश भाग भारतियांनी का शोधला असावा ? त्यांनी अतीवेग धारण केलेला असावा किंवा पेशीविभाजनसारख्या अतीसूक्ष्म हालचाली ते निरीक्षत असावे. दुसरे काही कारण संभवत नाही. - (वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृष्ठ क्र. ५५-५६, डॉ. पद्माकर विष्णु वर्तक)
स्थळ आणि काळ जोडलेले असणे (स्पेस-टाइम-कंटिन्युअम), या विज्ञानाने मांडलेल्या अत्याधुनिक सिद्धांताचे बीज भारतीय प्राचीन विज्ञानात आहे !
तिसर्‍या शतकात ब्रह्मगुप्त नावाच्या ज्योतिष्याने पवित्रक (कालपुरुष) गणित मांडले.
हिंदूंची काल संकल्पना
आपली काळाची धारणा ही पाश्‍चात्त्यांच्या काळसंकल्पनेसारखी संकुचित आणि क्षुद्र नाही. चतुर्युगाची कल्पना ही एका अतिप्रचंड काल संकल्पनेचा एक लहानसा उपविभाग आहे. आपली कालसंकल्पना ऐकून पाश्‍चात्त्यांची उफाळणारी संकल्पनाच त्यांचे डोळे पांढरे करील. पाश्‍चात्त्यांची उकळणारी soaring fancy सनातन हिंदूंची कालकल्पना ऐकताच झोकांड्या खाईल. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑगस्ट २००६)
अणूकणांमधील एनर्जी आणि त्या शक्तीमागचे विश्‍वमन हा क्रम आज अनेक शास्त्रज्ञही स्वीकारत आहेत. उपनिषदे आणि योगवसिष्ठ यांत काल अन् अवकाश यांच्या परिमाणांची डोळस चर्चा आढळते. आजच्या विज्ञानातील परिमाणचर्चेशी सदृश्य अशी ही चर्चा हिंदूंच्या प्रगल्भ मनावर प्रकाश टाकणारी आहे.

No comments:

Post a Comment